“शिवसेना आमच्याच बापाची, बंडखोरांना ५० खोके पचणार नाहीत”

Published on -

नाशिक : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेतील वाद शिगेला पोहचला आहे. बंडखोरांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. संबंधित बंडखोर आमदार अद्याप आम्ही शिवसेनेत आहोत, असा दावा करत असले तरी शिवसेनत फूट पडल्याचे स्पष्टपणे दिसत आहेत. ४० आमदार एकनाथ शिंदे गटात गेल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी पक्षबांधणी करायला सुरुवात केली आहे.

याच पार्श्वभूमीवर संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आले आहेत. शिवसेनेच्या मेळाव्यात त्यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना ही आमच्याच बापाची असून ५० खोके पचणार नाहीत, असे वक्तव्य संजय राऊतांनी केले आहे.

आजच्या सभेला व्यासपीठावर शिवसेनेचे सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, प्रत्येक शिवसैनिक आणि पदाधिकारी हजर आहे. आणि शिवसैनिकाला तर कुणीही पळवून नेऊ शकत नाही. ४० आमदार म्हणजे शिवसेना नाही. दोन-पाच खासदार इकडे तिकडे गेले म्हणजे शिवसेना हलली असे होत नाही. अजूनही १०० आमदार आणि २५ खासदार निवडून आणण्याची ताकद आमच्या धनुष्यबाणात आहे. शिवसेना आमच्याच बापाची आहे. बंडखोर आमदारांना ५० खोके पचणार नाहीत, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News