Pan Card Expiry : आता प्रत्येक महत्वाच्या कामात आधार कार्डसोबत (Adhar Card) पॅन कार्डदेखील (Pan Card) महत्वाचे आहे. पॅन कार्ड असल्याशिवाय कोणतीही महत्वाची कामे (Important works) होऊ शकत नाहीत.
आधार कार्डला जशी एक्सपायरी डेट (Expiry Date) असते तशीच पॅन कार्डला देखील असते का? बऱ्याच जणांना पॅन कार्डची मुदत (Term) आणि एक्सपायरी डेट याबद्दल माहिती असते, परंतु बऱ्याच जणांना त्याबद्दलची माहिती नसते.
पॅन कार्ड NSDL द्वारे जारी केले जाते. या कार्डमध्ये तुमची कोणतीही महत्त्वाची माहिती चुकीची टाकल्यास आपण ते अद्यतनित देखील करू शकता. त्याचबरोबर पॅन कार्डची वैधता किती दिवसांची आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे.
पॅन कार्डची वैधता व्यक्तीच्या आयुष्यभर टिकते. म्हणजेच जेव्हा व्यक्तीचा मृत्यू होतो. त्यानंतरच पॅन कार्ड अवैध ठरते. यामुळे पॅन कार्डची वैधता व्यक्तीच्या आयुष्यभर (Lifetime) राहते.
पॅन कार्डमध्ये प्रविष्ट केलेल्या 10 अल्फान्यूमेरिक नंबरमध्ये व्यक्तीचे सर्व महत्त्वाचे तपशील रेकॉर्ड केले जातात हे तुम्हाला क्वचितच माहित असेल. एखाद्या व्यक्तीकडे फक्त एकच पॅन कार्ड असू शकते. एकापेक्षा जास्त पॅनकार्ड ठेवल्यास दंड होऊ शकतो.
याशिवाय पॅनकार्डमध्ये त्या व्यक्तीची स्वाक्षरी आणि त्याचा फोटोही नमूद आहे.