स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका; ओबीसी समाजाबाबत राष्ट्रवादीचा मोठा निर्णय

Published on -

मुंबई :  राज्यात ओबीसी राजकीय आरक्षणाचा निर्णय रखडून आहे. त्यातच आता असताना काही ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयाला सर्वपक्षीयांचा विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

ओबीसी समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचे असल्याने येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी 27 टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विटरवरुन दिली आहे.

ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीक्षेत आपण सर्वचजण आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादीने सनदशीर मार्गाने सर्व प्रयत्न केले आहेत आणि यापुढेही करत राहू, असे आश्वासनही जयंत पाटील यांनी यावेळी दिले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe