Health Tips : चांगल्या आहारासोबतच (Good diet) पुरेशी झोपही (Sleep) महत्त्वाची आहे. बऱ्याच जणांना अंथुरणावर पडताच झोप येते तर काहींना तासन् तास झोपच येत नाही. पुरेशी झोप न झाल्याने त्याचा परिणाम (Effect) संपूर्ण दिवसावर होतो.
निरोगी शरीरासाठी चांगली झोप गरजेची आहे. पुरेशी झोप न मिळाल्याने त्याचा आरोग्यावर (Health) परिणाम होतो. स्वभावात चिडचिडेपणा (Irritability) येऊ लागतो.
जीवनशैली सुधारा
चांगली झोप येण्यासाठी तुमची जीवनशैली (Lifestyle) सुधारणे अत्यंत आवश्यक आहे. रात्री उशिरापर्यंत जागी राहणे किंवा फोन वापरणे, रात्री कॉफी किंवा चहा पिणे या काही वाईट जीवनशैलीच्या सवयी आहेत ज्यामुळे झोपेची समस्या उद्भवते. यामुळेच अनेक वेळा स्मृतिभ्रंश सारख्या समस्या उद्भवू लागतात.
मानसिक आणि शारीरिक ताण कमी करा
मानसिक आणि शारीरिक तणाव (Mental and physical stress) हे दोन्ही झोपेचे शत्रू मानले जातात. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा शारीरिक किंवा मानसिक तणाव जाणवत असेल, तर तुम्हाला पुरेशी झोप घेता येत नाही. अशा परिस्थितीत पुरेशी झोप न मिळाल्याने आरोग्याच्या अनेक समस्या सुरू होतात.
धूम्रपान आणि दारू पिणे सोडून द्या
सिगारेट आणि दारू पिणे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. लोकांना अनेकदा रात्री दारू पिण्याची सवय लागते, ज्यामुळे त्यांच्या झोपेच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम होतो. त्याचबरोबर धुम्रपान केल्यामुळे त्यांना अनेकदा रात्री खोकल्याची तक्रार होऊ लागते आणि परिणामी त्यांच्या झोपेवर परिणाम होतो.
नियमित व्यायाम
नियमित व्यायामाचे अनेक आरोग्य फायदे आहेत आणि त्याचबरोबर अनेक मानसिक आणि शारीरिक समस्याही दूर होतात. जर तुम्हाला नीट झोप येत नसेल तर तुम्ही नियमित व्यायामही करावा. व्यायामामुळे तुम्हाला चांगली झोप तर मिळतेच, पण त्याचबरोबर तुमच्या आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतात.
चांगला आणि संतुलित आहार घ्या
चांगले आरोग्य राखण्यासाठी चांगला आहार घेणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्हाला बाहेरचे खायला आवडत असेल तर आजच ते सोडा, कारण बाहेरचे खाल्ल्याने तुमच्या पचनावरच परिणाम होत नाही तर त्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात आणि तुमच्या झोपेवरही परिणाम होतो.