मुंबई : शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धुनष्यबाण यावरुन आता शिवसेनेच्या दोन गटांमध्ये कलगितुरा रंगला आहे. दोन्ही गटाकडून धनुष्यबाणावर आपला हक्क बजावला जात आहे.शिवसेनेच्या हातून धनुष्यबाण जाण्याची चिन्ह दिसत असतानाच आता शिवसेनेने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याबाबत एक याचिका दाखल केले आहे.
शिवसेनेने केलेल्या याचिकेमध्ये त्यांनी ‘आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर कोणताही निर्णय घेऊ नये,’ अशी मागणी केली आहे. धनुष्यबाण या चिन्हावर शिंदे गट दावा सांगू शकतो. म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी ही खबरदारी घेतल्याचे म्हटले जात आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केल्यानंतर आता काही खासदारदेखील शिंदे गटात सामील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक पातळीवर काही नगरसेवक आणि कार्यकर्तेदेखील एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा दावा केलेला आहे.