Ahmednagar News : माहेरी असलेल्या आई वडिलांना भेटण्यासाठी आलेल्या विवाहितेचे अज्ञात चोरट्यांनी शहरातील तारकपूर बसस्थानकातून ४ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व ७०० रुपये रोख रक्कम ठेवलेली पर्स लंपास केल्याची घटना भरदुपारच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, रुपाली रामेश्वर औटे (रा.श्रीराम सोसायटी,चंदननगर, पुणे) या नगरमध्ये माहेरी आल्या होत्या. आई-वडीलांना भेटून त्या दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास पुण्याला जाण्यासाठी तारकपूर बसस्थानकात गेल्या होत्या.

तेथे बसची वाट पाहत बसलेल्या असताना बसस्थानक नियंत्रण कक्षातून पुण्याला जाणारी गाडी फलाटाच्या विरुद्ध दिशेला लागणार असल्याची उद्घोषणा करण्यात आली. त्यावेळी त्या गडबडीने हातातील बॅग व पिशव्या घेऊन बसस्थानकाच्या विरुद्ध दिशेच्या फलाटाकडे जात असताना
या गडबडीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या बॅग मधील सोन्याचे दागीने ठेवलेली पर्स व रोख रक्कम चोरुन नेली. फिर्यादी औटे या विरुद्ध दिशेच्या फलाटवर गेल्यानंतर त्यांनी बॅगमध्ये पाहिले असता त्यांना पर्स आढळून आली नाही. याबाबत त्यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.