Maruti Suzuki Dealer : “या” भारतीय व्यक्तीकडे आहेत 45 विदेशी कार आणि 9 सुपरबाइक; तुम्हाला याबद्दल माहित होते का?

Ahmednagarlive24 office
Published:
Maruti Suzuki Dealer

Maruti Suzuki Dealer : आपल्या स्वप्नातील कार विकत घेण्याची सर्वांचीच इच्छा असते. पण क्वचितच लोकांची महागडी गाडी घेण्याचे स्वप्न पूर्ण होते. पण आज आपण अशा एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत, ज्याच्याकडे ज्याच्याकडे 45 विदेशी कार आणि 9 सुपरबाइक आहेत.

ज्या व्यक्तीबद्दल आता आपण बोलत आहोत त्या व्यक्तीकडे Maruti Suzuki ची डिलरशिप आहे. या व्यक्तीचे डीलरशिप नेटवर्क संपूर्ण ओडिशाचे कामकाज पाहते आणि त्याचा हा व्यवसाय 35 वर्षांहून अधिक काळापासून चालू आहे. या व्यक्तीचा व्हिडिओ YouTube वर अपलोड करण्यात आला आहे. या व्यक्तीकडे मारुती सुझुकी व्यतिरिक्त, ऑडी, सुझुकी टू व्हीलर, टीव्हीएस आणि हार्ले-डेव्हिडसन याची देखील डीलरशिप देखील आहेत.

या व्यक्तीचे नाव देवज्योती आहे. त्याने आपली पहिली डीलरशिप 1996 मध्ये सुरू केली होती, जी भुवनेश्वरमधील TVS शोरूम होती. 1999 मध्ये त्यांनी ओडिशाच्या राजधानीत अमेरिकन उत्पादक ओपलची डीलरशिप सुरू केली. त्यानंतर त्यांनी मारुती सुझुकीमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि त्यावेळी त्यांचे वय अवघे 24 वर्षे होते.

ऑटोमोबाईल्सच्या प्रेमापोटी त्यांनी कधीही त्यांच्या मालकीची वाहने विकली नाहीत. त्याचे कलेक्शन साध्या मारुती सुझुकी 800 पासून ते विदेशी लॅम्बोर्गिनी पर्यंत आहे. देवज्योतीने 35 वर्षात घेतलेली काही वाहने पुढीप्रमाणे…

Maruti Suzuki 800, Lamborghini Urus, MINI Cooper, Bentley Flying Spur, Audi A8 L, Audi Q8, Audi A7, Ford Mustang, Mahindra Thar, Aston Martin Vantage, Aston Martin DB11, Jeep Wrangler आणि Jeep Grand Cherokee अशा लग्जरी कार या व्यक्तीकडे अस्तित्वात आहेत.

याशिवाय, त्याच्याकडे लॅम्बोर्गिनी एव्हेंटाडोर स्पोर्ट्स कार देखील आहे, जी जगभरातील मर्यादित आवृत्ती आहे आणि जगभरात फक्त 600 युनिट्स विकल्या गेल्या आहेत. Lamborghini Urus बद्दल बोलायचे झाले तर, ही कार भारतातील आणि जगभरातील सेलिब्रेटींनकडे आहे. देवज्योतीने Lamborghini Urus भारतात लाँच केल्यानंतर लगेचच विकत घेतली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe