मुंबई : राज्यात सध्या राष्ट्रपती निवडणूक, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी, एकनाथ शिंदे गट, ठाकरे गटांची एकमेकांवर टीका टिपण्णी अशा अनेक राजकीय घडामोडी सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत या सर्व विषयांवर भाष्य केले आहे.
द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला म्हणजे भाजपला पाठिंबा दिला असे होते नाही, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. यावरुन संजय राऊत यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील शिवसेनेच्या भूमिकेसंदर्भातील संकेत दिले आहेत.

उद्धव ठाकरेंनी राष्ट्रपती निवडणुकीच्या संदर्भात देशातील वेगवेगळे मतप्रवाह आहेत. द्रौपदी मुर्मू या पहिल्या आदिवासी उमेदवार आहेत. आमश्या पाडवी यांच्यासह शिवसेनेतील इतर नेते उपस्थित होते. यशवंत सिन्हा हे विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत. विरोधी पक्ष टिकायला पाहिजे ही भूमिका असली तरी लोकभावना काय आहे, हे पाहणे महत्त्वाचे आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, आम्ही प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला म्हणजे भाजपला पाठिंबा दिला असे होत नाही. यशवंत सिन्हा यांना आमच्या सद्भावना आहेत, असे संजय राऊत म्हणाले आहेत.