मुंबई : शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठी फूट पाडून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेमध्ये शिंदे आणि ठाकरे गट पडले आहेत. सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये अद्यापही शिवसेनेचे आमदार, खासदार संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राज्याच्या राजकारणामध्ये अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र आता जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे कारण स्पष्ट केले आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून माझी आणि त्यांची भेट झाली नव्हती. माझ्या भागातील विकासकामांसाठी मी त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. मात्र, मुख्यमंत्री यांचा पुरेसा वेळ मला मिळाला नाही. भेटीसाठी मी पुन्हा त्यांची वेळ मागितली आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.