बंडखोरांना जागा दाखवण्याची भाषा करणाऱ्याच शीतल म्हात्रे शिंदे गटात सामील

Published on -

मुंबई : शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या आणि मुंबईच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी आता शिंदे गटात प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंसोबत निष्ठावान राहिलेल्या शीतल म्हात्रेंच्या निर्णयाने शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. शीतल म्हात्रेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुंबईतील निवासस्थानी शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह त्यांची भेट घेतली आहे.

शिंदे गटाच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणाची समीकरणं बदलली. या पार्श्वभूमीवर शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरेंची साथ देत बंडखोर आमदारांवर सडकून टीका देखील केल्याचे सर्वांनी पाहिले. शिंदेंच्या बंडानंतर शीतल म्हात्रे यांनी शिंदे गटाला ठणकावणारं भाषण केलं होतं. तुम्हाला रश्मी वहिनींच्या अश्रूंची शपथ आहे, सोडायचं नाही, बंडखोरांना जागा दाखवून द्यायची, अशा शब्दात म्हात्रेंनी एकनिष्ठतेची भाषा बोलून दाखवली होती. मात्र आता म्हात्रेंनी चांगलीच गुगली घेतल्याचे चित्र पहायला मिळाले आहे.

शिंदेंच्या बंडामुळे राज्यातच नाही तर मुंबईत देखील शिवसेना कमकुवत झाली आहे. या पार्श्वभूमीव निवडणुकीचे गणित नीट बसावे आणि महापालिकेतील प्रवेश सुकर व्हावा म्हणून शिंदे गटात सामील झाल्याचे म्हात्रेंनी सांगितले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News