मुंबई : एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या आज मुंबईमध्ये येणार असून भाजप आणि शिंदे गटाच्या आमदरांसोबत त्यांची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिवेसेनेच्या शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे.
द्रौपदी मुर्मू या मातोश्रीवर जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराने मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भेट घेतली आहे. त्यामुळे द्रौपदी मुर्मू याही मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार का हे पहावे लागणार आहे. कारण आज त्या मुंबई दौऱ्यावर असल्या तरी ठाकरेंशी त्यांच्या कोणताही कार्यक्रम ठरला नसल्याची माहिती मिळत आहे.

द्रौपदी मुर्मू या तीनच्या सुमारास मुंबई विमानतळावर दाखल होणार आहेत. त्यानंतर ५ वाजता त्या पुन्हा दिल्लीकडे होणार आहेत. त्यामुळे या कालावधीत मुर्मू मातोश्रीवर जाणार का हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदारांसोबत प्रचाराचे एक भाषण करुन त्या पुन्हा दिल्लीसाठी रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे.