राज्यपालांना उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करावं लागेल- जयंत पाटील

Published on -

मुंबई : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारला आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. शिंदेंनी भाजपसोबत हातमिळवणी करुन सत्ता स्थापन केली आणि महाविकास आघाडीचे सरकार क्षणार्धात कोसळले. त्यावरुन एकीकडे महाविकास आघाडी तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गट आणि भाजप असा चांगलाच कलगितुरा रंगला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करावे लागणार असल्याचे वक्तव्य केले आहे. ते आज पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी जयंत पाटलांनी हे मोठे वक्तव्य केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी ही बाब गंभीर तापळीवर घेतली आहे. या विषयामध्ये त्यांनी खंडपीठ तयार करण्याचा निर्णय घेतला असून जे अरुणाचल प्रदेशमध्ये झाले तेच महाराष्ट्रातही होत आहे. राज्यपालांना पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करावे लागेल, असे जयंत पाटील म्हणाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe