Hyundai car offers july 2022: भारतीय बाजारपेठेत (Indian market) वाहनांच्या विक्रीत (sales of vehicles) वाढ झाल्याने वाहन उद्योग (automobile industry) पुन्हा रुळावर येण्याचे संकेत मिळत आहेत.
बाजारपेठेतील ग्राहकांचा बदललेला दृष्टिकोन लक्षात घेऊन, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांची विक्री वाढवण्यासाठी ऑटोमेकर आपल्या कारवर (cars) मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. Hyundai Motor India जुलैमध्ये आपल्या कारवर Rs 50,000 पर्यंत सूट देत आहे. येथे जाणून घ्या Hyundai च्या कोणत्या मॉडेलवर किती सूट दिली जात आहे.
01 जुलै ते 31 जुलैपर्यंत वैध असलेल्या या ऑफरमध्ये Santro, Grand i10 Nios, i20, Aura, Xcent आणि Kona इलेक्ट्रिक SUV सारख्या कारचा समावेश आहे. Hyundai ने या महिन्यात सवलत योजनेचा भाग म्हणून CNG किटसह काही मॉडेल्सचाही समावेश केला आहे.
तथापि, कोरियन कार निर्मात्याकडील फ्लॅगशिप मॉडेल्स, जसे की Venue, Creta किंवा Alcazar, जुलैमधील सवलत ऑफरमध्ये समाविष्ट केलेले नाहीत.
Hyundai च्या जुलै ऑफर अंतर्गत, Kona इलेक्ट्रिक SUV आणि Xcent प्राइम मॉडेलवर सर्वात मोठी सूट उपलब्ध आहे. कंपनी या दोन्ही मॉडेल्सवर 50,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. Hyundai Santro वर 28,000 रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे.
कंपनी Grand i10 Nios मॉडेलवर 48,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. सवलतीत ऑफर केलेल्या CNG मॉडेल्समध्ये, Hyundai Grand i10 Nios कमाल 23,000 रुपयांपर्यंतच्या बेनिफिट्ससह खरेदी केली जाऊ शकते.
Hyundai Santro Era व्हेरियंटवर 23,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. यामध्ये रोख सवलत आणि 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस तसेच 3,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट यांसारख्या बेनिफिट्सचा समावेश आहे.
CNG प्रकारावर 13,000 रुपयांचा फायदा आहे. पण यात Era व्हेरिएंटप्रमाणे रोख सवलत मिळत नाही. सँट्रोच्या इतर सर्व प्रकारांवर 15,000 रुपयांच्या रोख सवलतीसह 28,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. Hyundai Grand i10 Nios Turbo प्रकार 48,000 रुपयांच्या फायद्यांसह सादर करण्यात आला आहे.
ऑफरमध्ये 35,000 रुपयांची रोख सूट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि कारवर 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे. सीएनजीसह इतर प्रकारांवरील सवलत रक्कम खूपच कमी आहे. Grand i10 Nios च्या CNG प्रकारावर 10,000 रुपयांची रोख सूट दिली जात आहे. Hyundai Aura वर देखील 23,000 रुपयांपर्यंत सूट आहे. तथापि, Aura च्या CNG प्रकारावर रोख सवलत नाही.