Jio Recharge Plans : जिओ (Jio) ही देशातील सगळ्यात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी (Telecom companies) एक आहे. जिओकडे 15 दिवसांपासून ते 365 दिवसांच्या वैधतेसह येणारे भन्नाट प्लॅन्स (Plans) उपलब्ध आहेत.
अनेक ग्राहकांकडून (Customer) वर्षभराच्या वैधतेसह येणाऱ्या प्लान्सला प्राधान्य (Priority) दिले जाते. परंतु तुम्हाला जर दररोज जास्त डेटा वापरत असाल तर दररोज जास्तीत जास्त जीबी डेटा ऑफर करणारा प्लॅन तुमच्या फायद्याचा (Beneficial) ठरतो.
2999 रुपयांचा जिओ रिचार्ज प्लॅन
जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 365 दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये इंटरनेट वापरासाठी दररोज 2.5 जीबी डेटा मिळत आहे. याशिवाय प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंगसह दररोज 100 एसएमएस देखील उपलब्ध आहेत.
प्लॅन रिचार्ज केल्यानंतर, तुम्हाला Disney Plus Hotstar चे सदस्यत्व देखील मिळेल. हा प्लान रिचार्ज केल्यानंतर तुम्ही Jio चे इतर ॲप्स (Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud) देखील वापरू शकता.
2545 रुपयांचा जिओ रिचार्ज प्लॅन
जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरासाठी दररोज1.5 जीबी डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये एकूण 336 दिवसांची वैधता उपलब्ध आहे.
या रिचार्ज प्लॅनमध्ये, अमर्यादित कॉलिंगसह दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत. प्लान रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन देखील मिळत आहे.