काँग्रेस-राष्ट्रवादीला म्हणावं आता तुम्ही तुमचे आमदार सांभाळा; गिरीष महाजनांचा खोचक टोला

Published on -

मुंबई : आज राष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे. भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी देशातील राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सूचक इशारा दिला आहे. 

काँग्रेस राष्ट्रवादीला म्हणावं आता तुम्ही तुमचे आमदार सांभाळा, शिवसेनेची चिंता करू नका. आघाडीतील मते फुटणार आहेत. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीप्रमाणे राष्ट्रपती निवडणुकीत देखील चमत्कार होणार आहे. भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातून २०० पेक्षा अधिक आमदारांची मतं मिळतील, असे गिरीष महाजन यांनी नमूद केले आहे.

काँग्रेस राष्ट्रवादीला म्हणावं आता तुम्ही तुमचे आमदार सांभाळा, शिवसेनेची चिंता करू नका. शिवसेनेचे आमदार, खासदार कुणाला मतदान करणार आहेत हे सर्वांना कळेल. परंतु, काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार कुणाला मतदान करणार आहे याची त्यांनी चिंता करावी. काँग्रेस-राष्ट्रवादीमधील देखील अनेक आमदार भाजपाच्या राष्ट्रपदीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करणार आहेत. निकालानंतर ते स्पष्ट होईल, असेही गिरीष महाजन म्हणाले आहेत. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की, राष्ट्रपती निवडणुकीत महाराष्ट्रातून आम्ही २०० मते घेऊ. निकालानंतर २०० पेक्षा अधिक आमदारांनी भाजपाच्या उमेदवारांना मतदान केल्याचं स्पष्ट होईल. विधान परिषद व राज्यसभेप्रमाणे पुन्हा एकदा चमत्कार घडेल आणि आम्ही २०० च्या पुढे मतं घेऊ. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीला कळेल की त्यांचे आमदार कुठे आहेत, असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe