दिल्लीच्या मीडिया रूममध्ये आली शिंदेकडून सहा खोकी, पण कशाची?

Ahmednagarlive24 office
Updated:

Maharashtra News:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आहेत. तेथे त्यांचा मुक्काम महाराष्ट्र सदनात आहे. तेथे त्यांची पत्रकार परिषद झाली. दिल्ली मुक्कामात पत्रकारांचा त्यांच्याशी संपर्क होत आहे.

काल अचानक महाराष्ट्र सदनातील मीडिया रुममध्ये सहा खोकी आली. ती पाहून पत्रकारांसह तेथील कर्मचारीही अवाक झाली. तर ती खोकी म्हणजे दुसरे तिसरे काही नसून मुख्यमंत्री शिंदे यांनी तेथील मीडिया रुमसाठी दिलेले सहा नवे कोरे संगणक आहेत.

तेही सरकारी नव्हे तर स्वत:च्या पैशांतू त्यांनी हे संगणक दिले असल्याचे सांगण्यात आले.मुख्यमंत्री शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यापासून एकीकडे आधीची काम स्थगिती करण्यावर आणि दुसरीकडे विविध कामांसाठी निधी देण्याचा सपाटाच सुरू केला आहे.

जेथे सरकारी सोपस्कर पूर्ण करून निधी देणे अवघड आहे, तेथे ते वैयक्तिकरित्या मदत देत आहे. गुवाहाटीत असताना आसाममधील पूरग्रस्तांसाठी २५ लाखांचा निधी देऊन त्यांनी ही सुरवात केली.

दिल्लीत महाराष्ट्र सदनात असताना तेथील मीडिया रूममधील संगणक जुने झाल्याचे त्यांना समजले. गेल्या अनेक वर्षांपासून येथील संगणक काहीच कामाचे उरले नव्हते. यासंबंधी पत्रकार आणि महाराष्ट्र सदन प्रशासनाकडून अनेकदा तक्रारी करण्यात आल्या होत्या.

मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. ही गोष्ट मुख्यमंत्री शिंदे यांना समजल्यानंतर त्यांनी स्वत: पुढाकार घेत स्वखर्चाने सहा नवे कोरे संगणक या कक्षासाठी दिले. त्याची खोकी तेथे आल्याचे पाहून सर्वजण अचंबित झाले. मात्र, शिंदे स्वखर्चाने अशी मदत का करीत आहेत? कुठपर्यंत करणार? असा प्रश्नही तेथील काही पत्रकारांनी उपस्थित केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe