Amazon Prime Day 2022: अॅमेझॉन प्राइम डे सेलमध्ये स्मार्टफोन मिळतील जवळपास निम्म्या किमतीत, या मोबाईलवर बंपर डिस्काउंट…..

Amazon Prime Day 2022: अॅमेझॉन प्राइम डे सेल (Amazon Prime Day Sale) 23 जुलैपासून सुरू होणार आहे. हा सेल 24 जुलैपर्यंत चालणार आहे. हे फक्त प्राइम सदस्यांसाठी (Prime Member) उपलब्ध करून दिले जाईल. कंपनीने सांगितले आहे की, या सेलदरम्यान मोबाईल फोन (mobile phone), अॅक्सेसरीजवर 40 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाईल.

याशिवाय सेलमध्ये एक्सचेंज डिस्काउंट आणि नो-कॉस्ट ईएमआय (No-Cost EMI) पर्याय देखील दिले जातील. यासाठी कंपनीने आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) आणि स्टेट बँक ऑफ इंडियाशी (State Bank of India) भागीदारी केली आहे. यासह, वापरकर्त्यांना कार्ड किंवा ईएमआय व्यवहारांवर 10 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाईल.

ऍपल आयफोन 13 –

2021 मध्ये लॉन्च झालेला Apple iPhone 13, सेल दरम्यान 66,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत विकला जाईल. जुन्या आयफोन मॉडेल्सची देवाणघेवाण करून ग्राहक अतिरिक्त सवलतींचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये अॅपलचा A15 बायोनिक चिपसेट देण्यात आला आहे.

OnePlus Nord CE 2 5G –

OnePlus Nord CE 2 5G मध्ये MediaTek Dimensity 900 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन फेब्रुवारीमध्ये 23,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत सादर करण्यात आला होता. Amazon Prime Day 2022 सेल दरम्यान हा फोन 22,499 रुपयांना खरेदी करता येईल. यावर खरेदीदारांना अतिरिक्त एक्सचेंज ऑफर देखील दिली जाईल.

Samsung Galaxy M13 –

नवीन लॉन्च केलेला Samsung Galaxy M13 Amazon प्राइम डे 2022 सेल दरम्यान 2000 रुपयांच्या सवलतीसह विकला जाईल. हा स्मार्टफोन 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. सेल दरम्यान तुम्ही ते 9,999 रुपयांना खरेदी करू शकता.

रेडमी नोट 11 –

परवडणारी Redmi Note 11 फक्त Rs 10,749 मध्ये साइटवर सूचीबद्ध केली जाईल. हा स्मार्टफोन याच वर्षी फेब्रुवारीमध्ये सादर करण्यात आला होता. Amazon च्या प्राइम डे सेलमध्ये तुम्ही क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर सह येणारा हा फोन अगदी कमी किंमतीत खरेदी करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe