राष्ट्रपती निवणुकीचा पहिला निकाल हाती, पहा कोणाला किती मते?

Ahmednagarlive24 office
Published:

Maharashtra News:राष्ट्रपती निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. खासदारांची मतमोजणी पूर्ण झाली असून आता आमदारांची बाकी आहे. खासदारांच्या मतमोजणीत द्रौपदी मुर्मू यांनी अपक्षेप्रमाणेच नोठी आघाडी घेतली आहे.

खासदारांची ७४८ मते वैध ठरली आहेत. त्यांचे एकूण मूल्य ५ लाख, २३ हजार ६०० आहे. त्यातील ५४० मते मुर्मू यांना मिळाली आहेत. त्यांचे मूल्य ३ लाख ७८ हजार होते. तर यशवंत सिन्हा यांना २०८ मते मिळाली आहेत.

त्यांचे मूल्य १ लाख, ४५ हजार ६०० एवढे होत आहे.पहिल्या फेरीत खासदारांची मते मोजण्यात आली. आता देशभरातून आलेल्या आमदारांच्या मतांची मोजणी केली जाणार आहे. त्यानंतर सर्वमिळून एकत्रित निकाल जाहीर होणार आहे. आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे मूर्मू यांनीच मोठी आघाडी घेतली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe