iPhone 12 : आयफोन खरेदीदारांना सुखद धक्का, कमी किमतीत खरेदी करता येणार iPhone 12

Ahmednagarlive24 office
Published:

iPhone 12 : आपल्याकडे आयफोन (iPhone) असावा असे बऱ्याच जणांचे स्वप्न (Dream) असते. परंतु, आयफोनच्या किंमती (Price) सर्वसामान्यांच्या बजेटबाहेर (Budget) असल्याने बरेच जण त्याला खरेदी (Buy) करू शकत नव्हते.

जर तुम्हाला आयफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. आता अवघ्या काही हजारात आयफोन तुम्हाला खरेदी करता येत आहे.

मात्र, यासाठी तुम्हाला बँक ऑफर लागू करावी लागेल. iPhone 12 चा 64GB व्हेरिएंट सध्या Amazon वर 54,990 रुपयांना लिस्ट झाला आहे. त्याचा 128GB स्टोरेज व्हेरिएंट Rs 59,999 मध्ये सूचीबद्ध आहे.

आयफोन 12 डील

ज्या किंमतीला iPhone 12 सूचीबद्ध केले आहे. त्यापेक्षा खूपच कमी किमतीत तुम्ही ते खरेदी करू शकता. तुम्ही त्याची किंमत 10 टक्क्यांपर्यंत कमी करू शकता. 5 टक्के Amazon डिस्काउंट व्यतिरिक्त, तुम्ही Amazon Pay ICICI कार्डने अतिरिक्त 5 टक्के सूट घेऊ शकता.

म्हणजेच, तुम्ही iPhone 12 वर सूचीबद्ध केलेल्या किंमतीवरून एकूण 10 टक्के सूट घेऊ शकता. यामुळे त्याची किंमत 10 टक्क्यांनी कमी होते. या डील्स लागू केल्यानंतर तुम्ही हा स्मार्टफोन 50,391 रुपयांना खरेदी करू शकता.

फ्लिपकार्टवरही सेल सुरू आहे. iPhone 12 128GB फ्लिपकार्टवर 56,999 रुपयांना सूचीबद्ध आहे. याशिवाय कंपनी Axis Bank क्रेडिट कार्डवर ही 10% सूट देत आहे.

तर iPhone 12 चा 64GB स्टोरेज व्हेरिएंट 51,999 रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. हे Axis Bank कार्डवर ऑफर केले जात आहे. म्हणजेच, तुम्हाला Amazon किंवा Flipkart वर जवळपास समान डील मिळतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe