लायकी नव्हती, तरी उद्धव साहेबांनी पाठीवर थाप मारली; शिवसेनेची धैर्यशील मानेंवर टीका

Updated on -

कोल्हापूर : बंडखोर खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात कोल्हापूरमध्ये शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. धैर्यशील माने यांच्या कोल्हापूरमधील रुईकर कॉलनीमधील निवासस्थानावर शेकडो शिवसैनिकांचा मोर्चा धडकणार आहे. मोर्चाला प्रारंभ होण्यापूर्वी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी धैर्यशील माने यांच्यावर कडाडून हल्ला चढवला, बाळासाहेब माने यांचे नातू असाल, तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा, असे आव्हानच त्यांनी यावेळी दिले आहे.

1 शिवसैनिक 100 जणांना भारी असल्याचे ते यावेळी म्हणाले. पोलिसांनी कितीही बंदोबस्त लावला, तरी आम्ही निवासस्थानी घुसणार असल्याचे आक्रमक शिवसैनिक म्हणाले आहेत. गली गली शोर है, धैर्यशील माने चोर है, उद्धव ठाकरेंशी बेईमानी आणि गद्दारी केल्याच्या घोषणाही यावेळी आक्रमक शिवसैनिकांकडून देण्यात आल्या.

माने गटाने दोनवेळा गद्दारी केली आहे. यांची लायकी नव्हती, तरीही उद्धव ठाकरेंनी पाठीवर थाप मारली. पदरचे पैसे खर्च करून निवडून आणले. दुसऱ्या गटात गेले हीच गद्दारी आहे. गद्दाराला क्षमा नसल्याचे मुरलीधर जाधव  म्हणाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News