Mika Singh : अखेर मिका सिंगला मिळवली वधू, लवकरच अडकणार लग्नबंधनात?

Published on -

Mika Singh : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंगचा स्वयंवर खूप चर्चेत होता. वयाच्या 45व्या वर्षी मिका सिंग की दुल्हनियाचा शोधही पूर्ण झाला आहे. गायकाने नॅशनल टेलिव्हिजनवर आपली दुल्हनियाची निवड केली आहे. मिका सिंगच्या स्वयंवर ‘मिका दी वोटी’च्या अंतिम फेरीत, गायकाने अभिनेत्री आकांक्षा पुरी हिला वधूच्या रुपात स्वीकारले आहे.

या शोमध्ये आकांक्षा पुरीसोबत बंगालची प्रणितिका दास आणि नीत महल फायनलमध्ये पोहचल्या होत्या. पण दोघांनाही हरवून आकांक्षा पुरीने मिका सिंगचा हा स्वयंवर शो जिंकला आहे. यानंतर दोघांनी एकमेकांना पुष्पहार घातला, ज्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

आपल्या लाइफ पार्टनरच्या शोधात आयोजित या स्वयंवरमध्ये मिका सिंगने आकांक्षा पुरी हिची जोडीदार म्हणून निवड केली. मात्र, यादरम्यान त्याने आकांक्षासोबत लग्न केले नाही. शोच्या शेवटी आकांक्षाला विजेता घोषित करून, मिकाने अभिनेत्रीला फक्त ब्रेसलेट आणि हार घातला. महिनाभर चाललेल्या या रिअ‍ॅलिटी शोमध्ये अनेक स्पर्धकांनी भाग घेतला होता, त्यापैकी मिकाने आता आकांक्षा पुरीची वधू म्हणून निवड केली आहे.

लग्न कधी करणार?

मिका सिंग की दुल्हनिया निवडण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अशा परिस्थितीत शोच्या विजेत्याच्या घोषणेने काही लोक आनंदी आहेत, तर काहींची निराशाही झाली आहे. वास्तविक चाहत्यांना मिकाचे लग्न नॅशनल टीव्हीवर बघायचे होते. पण गायकाने लग्न न करून चाहत्यांची निराशा केली आहे. अशा परिस्थितीत आता प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की मिकाने आपली वधू निवडली आहे पण आता तो तिच्याशी लग्न कधी करणार?

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe