EPF To NPS : भविष्यात (Future) एनपीएसपेक्षा (NPS) मोठा निधी निर्माण करण्यासाठी ईपीएफ (EPF) अधिक उपयुक्त पडेल का असा प्रश्न अनेक नोकरदारांच्या मनात निर्माण होतो. तुमच्या कंपनीने जर तुम्हाला परवानगी दिली तर तुम्ही तुमचे ईपीएफ पैसे एनपीएसमध्ये ट्रान्सफर शकता.
ईपीएफमध्ये योगदान दिलेले पैसे गव्हर्नमेंट ट्रस्ट एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड (Government Trust Employees Provident Fund) ऑर्गनायझेशनद्वारे सुरक्षित ठेवले जात आहेत. त्याचबरोबर एनपीएसमध्ये योगदान दिलेल्या रकमेची जबाबदारी ही ईपीएफओने (EPFO) नियुक्त केलेल्या निधी व्यवस्थापकांवर असते.
काही प्रक्रियेच्या मदतीने तुम्ही तुमचे EPF पैसे NPS मध्ये ट्रान्सफर करू शकता. ही प्रक्रिया अगदी सोपी आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
तथापि, EPF मधून NPS मध्ये पैसे हस्तांतरित (Transferred) करण्यासाठी, तुमच्याकडे सक्रिय Tier-1 NPS खाते असणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या मालकाच्या मदतीने ते उघडू शकता. नियोक्त्याकडून परवानगी मिळाल्यानंतर, खाते उघडण्यासाठी तुम्हाला NPS पोर्टल npstrust.org.in ला भेट द्यावी लागेल.
NPS खाते उघडल्यानंतर, तुम्हाला EPF मधून NPS खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी अर्ज करावा लागेल. पडताळणीनंतर, EPFO तुमची रक्कम NPS नोडल ऑफिसच्या नावाने चेक किंवा ड्राफ्टद्वारे जारी करेल.
या प्रक्रियेनंतर तुमचे पैसे पीएफ खात्यातून एनपीएस खात्यात जातील. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, EPFO तुमच्या नियोक्त्याला याबद्दल सूचित करेल. या प्रक्रियेचे अनुसरण करून, तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातील पैसे NPS खात्यात सहजपणे हस्तांतरित करू शकता आणि चांगला परतावा मिळवू शकता.