Trojan Virus : स्मार्टफोन युजर्स सावधान! ट्रोजन व्हायरसचा पुन्हा धुमाकूळ, ‘या’ डझनभर Apps मध्ये आढळला व्हायरस

Trojan Virus : बऱ्याचदा स्मार्टफोन यूजर्सना (Smartphone Users) अनेक व्हायरसचा (Virus) सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांचे खूप नुकसान होते. गुगल प्ले स्टोअरमध्ये (Google Play Store) असलेल्या बऱ्याच ॲप्समध्ये व्हायरस असल्याचे निश्चित झाले आहे.

अहवालानुसार, बहुतेक स्मार्टफोनमध्ये असलेल्या ॲप्समध्ये (Apps) ट्रोजन व्हायरस आढळला आहे. त्यामुळे स्मार्टफोन यूजर्सना सतर्क (Alert) राहण्याचा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालवेअर विश्लेषकांना Google Play Store वर डझनभर व्हायरस ॲप सापडले आहेत, ज्यात प्रामुख्याने ॲडवेअर ट्रोजन मालवेअरचा समावेश आहे. यासोबतच घोटाळेबाजांकडून वापरण्यात येणारे बनावट ॲप्स (Fake apps) आणि गोपनीय डेटाला टार्गेट करणारे आणि डेटा चोरणारे इतर ॲप्सही सापडले आहेत.

लाखो लोकांनी हे ट्रोजन डाउनलोड केले

तथापि, मेच्या तुलनेत अँड्रॉइड स्पायवेअरच्या (Spyware) जूनमधील क्रियाकलाप 20 टक्क्यांनी कमी झाला आहे. वेगाने पसरणाऱ्या ॲडवेअर ट्रोजनच्या क्रियाकलापांमध्येही घट झाली आहे. अहवालानुसार, मालवेअर विश्लेषकांनी Google Play वर डझनभर दुर्भावनापूर्ण ॲप्स शोधले, त्यापैकी ॲडवेअर ट्रोजन.

येथे आश्चर्याची गोष्ट म्हणजे 9.89 दशलक्ष पेक्षा जास्त लोकांनी हे 30 ॲडवेअर ट्रोजन डाउनलोड केले आहेत. ट्रोजन मालवेअर सापडलेल्या ॲप्समध्ये इमेज-एडिटिंग सॉफ्टवेअर, व्हर्च्युअल कीबोर्ड, सिस्टम टूल्स आणि युटिलिटीज, कॉलिंग ॲप्स, वॉलपेपर कलेक्शन यांचा समावेश आहे.

या Android ॲप्समध्ये ट्रोजन मालवेअर आढळले

रिपोर्टनुसार, ब्युटी फिल्टर्स, करेक्शन्स आणि कटआउट्स, आर्ट फिल्टर्स, डिझाइन मेकर, फोटो एडिटर, बॅकग्राउंड इरेजर, फोटो आणि एक्झीफ एडिटर, फिल्टर इफेक्ट्स, फोटो फिल्टर्स आणि इफेक्ट्स, ब्लर इमेज, कट, पेस्ट, इमोजी कीबोर्ड, निऑन थीम कीबोर्ड , फास्टक्लीनर, लाइव्ह स्क्रीन, स्मरणपत्रे यांसारख्या Android ॲप्समध्ये ट्रोजन मालवेअरची पुष्टी झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe