राज्यपालांची जीभ पुन्हा घसरली, विरोधक भडकले

Published on -

Maharashtra Politics : वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत असणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा मुंबईबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे मराठी माणूस दुखावला असल्याने विरोधकांकडून चौफेर टीका सुरू झाली आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद भाजपसाठी अडचणीचा ठरू शकते. एका कार्यक्रमात बोलताना राज्यपाल म्हणाले, “कधी कधी मी महाराष्ट्रातल्या लोकांना सांगत असतो की महाराष्ट्रात खासकरून मुंबई आणि ठाण्यातून गुजराथी समाजाचे आणि राजस्थानी समाजाचे लोक निघून गेले तर तुमच्याकडे कुठले पैसे उरणारच नाहीत.

मुंबईला जे आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते म्हटलंही जाणार नाही” यावरून मनसेचे संदीप देशपांडे, शिवसेनेत नव्याने प्रवेश केलेल्या सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. याशिवाय सोशल मीडियातून राज्यपालांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटत आहेत.

राज्यपालांनी याआधीही वादग्रस्त वक्तव्य केलेले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या लग्नावरून त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होते. रामदास स्वामी गुरु नसते तर छत्रपती शिवराय घडलेच नसेल असेही राज्यपाल एकदा म्हणाले होते. तेव्हा त्यांना रोषाला सामोरे जावे लागले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News