Ahmednagar News : दूधाचा व्यवसाय करण्यासाठी बाजारातून नवीन म्हैस खरेदी करण्यासाठी जाणाऱ्या एका तरुण शेतकऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्याच्याकडील ८०हजार रुपयांची रोक रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहेत. ही घटना शेवगाव तालुक्यात घडली.
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीव्यवसाय तोट्यात आहे. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात असून त्यातून बाहेर पडण्यासाठी शेती पुरक दूध व्यवसाय हा चांगला पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक जण आता या व्यवसायात उतरले आहेत.
शेवगाव तालुक्यातील राजू परदेशी हे शेवगाव येथील कँनरा बँकेत शनिवारी दुपारच्या सुमारास पैसे काढण्यासाठी आले. त्यांनी बँकेतून ८० हजार रुपये काढून दुचाकीवर दहिफळला निघाले या पैशातून त्यांना एक म्हैस खरेदी करायची होती.
मात्र दहिफळकडे जात असतांना प्रणव हाँटेल जवळ चेहरा झाकलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या दुचाकीला पल्सर दुचाकी आडवी लावली. त्यांना मारहाण करुन डोळ्यात मिरची पावडर टाकून त्यांच्याकडील ८० हजार रुपये घेवून पसार झाले. त्यांनी आरडाओरड केल्याने तेथून जाणाऱ्यांनी त्यांना मदत करुन नातेवाईकांना बोलावून घेतले.