Ahmednagar Politics : आजच्या राजकिय परिस्थितीत दोन विरोधी पक्षातील पुढारी एकमेकांना पाण्यात पाहत असल्याचे चित्र असताना मात्र जामखेड तालुक्यात वेगळेच चित्र पहायला मिळाले. ते म्हणजे भाजपचे आमदार राम शिंदे व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे दोघेही एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.
निमित्त होते ते आनंदऋषी महाराज यांच्या जयंत्तीचे. येथील सकल जैन समाजाच्या वतीने आनंदऋषी महाराज यांच्या जयंत्तीनिमित्त आयोजित कार्यकमात एकाचवेळी भाजपाचे आमदार प्रा.राम शिंदे व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे दोघेही प्रथमच एकाच वेळी एकत्र आले होते.

इतरवेळी कोणीच एकमेकांवर टीकाटिप्पणी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र यावेळी दोघांनीही संतांच्या विचारांविषयी मार्गदर्शन केले. राष्ट्रसंत आनंदऋषी महाराजांचे विचार पिढ्या न पिढ्या समाजाला प्रेरणादायी ठरतील. शांतता,संयम व नम्रता या गुणांचे आपण अनुकरण केले तर आपणासही काहीही कमी पडत नाही.
असे मत आ.राम शिंदे यांनी व्यक्त केले तर आचार्य आनंदऋषी महाराजांच्या जन्मगावी गेल्यावर एक वेगळीच ऊर्जा व प्रेरणा मिळते. आचार्य आनंदऋषी महाराजांनी सामान्य लोकांना समजेल असे ज्ञान दिले. पुढील पिढीला संतांचे विचार समजावेत म्हणून अशा कार्यक्रमाची खरोखरच गरज असल्याचे आ.पवार म्हणाले.