Mahindra Bolero PikUp Electric लवकरच होणार लॉन्च ; जाणून घ्या फीचर्स 

Published on -

Mahindra Bolero PikUp Electric:   महिंद्रा बोलेरो पिकअप इलेक्ट्रिक (Mahindra Bolero PikUp Electric) लवकरच लॉन्च होऊ शकते. कंपनीने त्याचा अधिकृत टीझर (official teaser) रिलीज केला आहे.

यूट्यूबवर (YouTube) शेअर केलेल्या 10 सेकंदाच्या टीझरमध्ये कंपनीने ‘फ्यूचर ऑफ पिक-अप्स’ (‘Future of pick-ups’) ही टॅगलाइन वापरली आहे. कंपनीने अराइव्हिंग सून व्हिडिओमध्ये या पिक-अप व्हॅनची झलक दिली आहे.

या टीझरमध्ये बोलेरो पिकअपच्या डिझाईनसाठी ब्लू लाइनचा वापर करण्यात आला आहे. यामागे कंपनीची नवी रणनीती असू शकते. समोर येत असलेल्या रिपोर्ट्सनुसार, आगामी बोलेरो पिकअप इलेक्ट्रिकची रेंजही चांगली असू शकते.


महिंद्राने यापूर्वी Treo इलेक्ट्रिक थ्री-व्हीलरसाठी निळ्या रंगाचा वापर केला होता. महिंद्रा ट्रेओ (Mahindra Treo) ही भारतात विकली जाणारी लोकप्रिय इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर (three-wheeler) आहे. सुमारे 5 वर्षांपूर्वी, कंपनीने e20 आणि e20 Plus इलेक्ट्रिक कारसाठी समान निळा रंग वापरला होता, जो कंपनीची आगामी पिक-अप व्हॅन इलेक्ट्रिक असेल असे सूचित करतो.

ही डिजाइन असणार का ?
महिंद्रा बोलेरो पिकअप इलेक्ट्रिकमध्ये सध्याच्या पिकअपच्या तुलनेत थोडे डिझाइन बदल दिसू शकतात. व्हिडिओ टीझरमध्ये, महिंद्राचा लोगो दोन फ्रंट-माउंटेड हेडलॅम्प्समध्ये दिसू शकतो. हा लोगो समोरच्या फ्रंट ग्रीलच्या मध्यभागी दिसत आहे . त्याचवेळी पिकअप व्हॅनच्या व्हील फ्रेमची झलकही टीझरमध्ये पाहायला मिळते.

150km ची रेंज मिळेल
महिंद्रा बोलेरो पिकअप इलेक्ट्रिकची लोडिंग क्षमता सध्याच्या पिकअपसारखीच असू शकते. इतकंच नाही तर आगामी पिकअप व्हॅनमध्ये आयसीई पॉवर्ड चेसिसचाही वापर केला जाऊ शकतो. अहवालानुसार, महिंद्रा बोलेरो पिकअप इलेक्ट्रिक एका चार्जवर 150km ची रेंज मिळवू शकते.

कंपनी सध्या शहरांमध्ये माल पोहोचवण्यासाठी हा पिकअप सुरू करणार आहे. त्याची रेंज आणि भार इ. येत्या काही वर्षांत अपग्रेड केले जाऊ शकते. लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी, तुम्हाला डिझेल वाहनांवर अवलंबून राहावे लागेल, कारण इलेक्ट्रिक वाहनांची रेंज कमी असते.

तसेच, भारतातील चार्जिंग स्टेशनची पायाभूत सुविधा विकसित होण्यास बराच वेळ लागेल. या वर्षी महिंद्राने आपला ईव्ही पोर्टफोलिओ मजबूत केला आहे. 15 ऑगस्ट रोजी कंपनी 5 नवीन इलेक्ट्रिक SUV चे अनावरण करू शकते. याशिवाय XUV400 इलेक्ट्रिक SUV चे उत्पादन पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe