तुकोबांच्या देहू नगरीत हे पहा काय घडलंय?

Ahmednagarlive24 office
Published:

Maharashtra News: राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांच्या ज्या देहू नगरीत टाळ-मृदुंगाचे नित्य वादन केले जाते, त्याच देहून पत्ते कुटत बसलेल्या २६ जुगाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

विशेष म्हणजे यामध्ये देहू येथील संत तुकाराम महाराज देवस्थानच्या एका विश्वस्ताचाही समावेश आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी श्रीक्षेत्र देहू येथील एका मोठ्या जुगार अड्यावर छापा घातला.

तेथे २६ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अटक करण्यात आलेल्यांमध्ये देहू नगरपंचायतीचे एक नगरसेवक, एका नगरसेविकेचे पती आणि देहू देवस्थानच्या एका विश्वस्ताचा समावेश आहे.

देहूतील एका कंपनीच्या आवारात तीनपानी जुगार सुरु होता. पकडले गेलेले सर्व माळवाडी, देहूचे रहिवासी आहेत. त्यात याशिवाय स्थानिक कापड व्यापारी, केबलचालक, नोकरदार, रिक्षाचालक, सुरक्षारक्षक, सेवानिवृत्त यांचाही यात समावेश आहे.

आरोपींकडून पाच लाख ३६ हजार रोख, दोन मोटारी, १८ मोटारसायकली आणि २७ मोबाईल असा सुमारे ३५ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe