Business Idea: भारतात शेतकरी बांधव (Farmer) आता मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकांची शेती (Vegetable Farming) करू लागले आहेत. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव देखील कमी दिवसात आणि कमी खर्चात काढण्यासाठी तयार होणाऱ्या भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात शेती (Farming) करत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे भाजीपाला वर्गीय पिकांची शेती शेतकऱ्यांना अधिक नफा (Farmer Income) मिळवून देत आहे. मित्रांनो शिमला मिरची हे देखील एक प्रमुख भाजीपाला पीक आहे. जाणकार लोकांच्या मते, सिमला मिरचीचा भाव बाजारातील इतर भाज्यांपेक्षा सामान्यतः चांगला असतो.
यामुळे ज्या शेतकऱ्यांनी या पिकाची शेती केली आहे, ते आज चांगले पैसे कमवत आहेत. राज्यातील असे अनेक शेतकरी आहेत ज्यांना सिमला मिरचीच्या लागवडीतून (Capsicum Farming) चांगले उत्पन्न मिळत आहे. येथील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली शिमला मिरची संपूर्ण देशात विक्रीसाठी पाठवली जात आहे. सामान्य भाज्यांप्रमाणेच त्याची लागवडही सर्व प्रकारच्या हवामानात केली जाते. चांगल्या परिणामांसह शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळते.

जाणकार लोकांच्या मते, शिमला मिरची लागवड करण्यासाठी जमिनीची नांगरणी करून आधीच्या पिकांचे अवशेष गोळा करून जाळून टाकावेत आणि तणनाशकाची फवारणी करून शेतकरी बांधवांनी शिमला मिरचीची लागवड करावी. त्यामुळे शिमला मिरचीच्या पिकात तण वाढणार नाही तसेच शिमला मिरचीचे उत्पादन देखील वाढणार असा दावा केला जातो.
ठिबक सिंचन वापरण्याचे फायदे
जाणकार लोक सांगतात की, ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून शिमला मिरचीची शेती केल्यास पाण्याची बचत होते शिवाय उत्पादनात वाढ होते. शेतीसाठी ही सर्वोत्तम सिंचन पद्धत आहे. सध्या देशातील शेतकरी बांधव हळूहळू का होईना पाणी देण्याच्या पारंपरिक पद्धतीतून बाहेर पडत आहेत. या पद्धतीत पैसे गुंतवल्यानंतर पाण्याची बचत करता येते तसेच गरजेनुसार पाणीही देता येते. खर्चात बचत होते आणि उत्पादन चांगले होते. या पद्धतीद्वारे आपण खताचा योग्य वापरही करू शकतो. शिवाय सरकार या पद्धतीवर मोठी सवलत तसेच अनुदान देत आहे.
अवघ्या 75 दिवसांत मिळते उत्पादन
शेतात बेड तयार केल्यानंतर योग्य अंतरावर सिमला मिरचीची तयार रोपे लावली जातात. वेळोवेळी योग्य खत, पाणी आणि कीटकनाशकांची फवारणी केल्यास उत्तम पीक मिळते. सिमला मिरची लागवडीसाठी जमिनीचे pH मूल्य 6 असावे. सिमला मिरची वनस्पती 40 अंशांपर्यंत तापमान सहन करू शकते आणि रोपे लावल्यानंतर सुमारे 75 दिवसांनी उत्पादन देण्यास सुरुवात होते. एका हेक्टरमध्ये सुमारे 300 क्विंटल सिमला मिरचीचे उत्पादन होते.