OLA Electric: ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) भारतीय बाजारपेठेत आणखी एक दुचाकी लॉन्च करणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ओला इलेक्ट्रिक आपली S1 ई-स्कूटर (S1 E-Scooter) बाजारात आणणार आहे. तसेच, कंपनी आपल्या इलेक्ट्रिक कार (electric car) संदर्भात एक मोठे अपडेट देखील देऊ शकते.
गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी ओलाने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर (Ola’s first electric scooter) बाजारात आणली होती. यावेळीही कंपनी आपली नवीन स्कूटर घेऊन येत आहे.
ओला इलेक्ट्रिकचे आणखी एक उत्पादन असेल –
रिपोर्टनुसार, आगामी स्कूटर Ola S1 पेक्षा चांगले फीचर्स आणि रेंजसह (Good features and range) येईल. भारतीय बाजारपेठेतील ओला इलेक्ट्रिकचे हे दुसरे उत्पादन असेल. ओला इलेक्ट्रिक याला ‘ग्रीनेस्ट ईव्ही (Greenest EV)’ म्हणत आहे. कंपनीने आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे नवीन स्कूटर लॉन्च झाल्याची माहिती दिली आहे आणि तारीख देखील दिली आहे. मात्र, स्कूटरच्या फीचर्सबाबत कंपनीकडून फारशी माहिती देण्यात आलेली नाही.
भाविश अग्रवाल यांनी टीझर शेअर केला आहे –
ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल (Bhavish Aggarwal) यांनी नुकताच एक टीझर व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच त्याने लिहिले- ‘आम्ही 15 ऑगस्टला आमची ग्रीनेस्ट ईव्ही सादर करू’. इलेक्ट्रिक स्कूटरच्या डिझाईनची झलकही टीझरमध्ये दिसून आली.
आगामी नवीन स्कूटरची रचना Ola S1 Pro सारखी दिसते. अशा परिस्थितीत कंपनी Ola S1 Pro चे अपडेटेड व्हर्जन आणण्याची शक्यता आहे. मात्र, कंपनी कोणती स्कूटर घेऊन येत आहे, हे 15 ऑगस्टलाच कळेल.
आगामी स्कूटर कशी असेल –
जर बातमीवर विश्वास ठेवायचा असेल तर ओलाची आगामी स्कूटर OLA S1 Pro पेक्षा कमी पॉवरची इलेक्ट्रिक मोटर आणि लहान बॅटरी पॅकसह दिसू शकते. कंपनी नवीन स्कूटरची किंमत OLA S1 Pro पेक्षा कमी ठेवू शकते. OLA S1 Pro मध्ये 3.97 kWh चा बॅटरी पॅक उपलब्ध आहे.
कंपनीचा दावा आहे की, या बॅटरीच्या आधारे स्कूटरला एकदा चार्ज करून 181 किमी पर्यंत चालवता येते. OLA S1 Pro चा टॉप स्पीड 115 kmph आहे. Ola S1 STD ची किंमत 99,999 रुपये आणि Ola S1 Pro ची किंमत 1,39,999 रुपये आहे.