अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- दिल्ली निवडणुकीत भाजप, राजद, काँग्रेस, लाेजपसह देशभरातील सर्वच राजकीय पक्ष आमच्या विराेधात आले आहेत.
हे लाेक तुम्हाला, तुमच्या मुलास पराभूत करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. परंतु जनताच या सर्व पक्षांना सडेताेड उत्तर देईल, अशा भावुुक शैलीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी मतदारांशी संवाद साधला.
गाेकलपुरी येथील राेड शाेमध्ये केजरीवाल बाेलत हाेते. ते म्हणाले, सरकारने प्रत्येक घरातील विजेच्या देयकाचा भरणा केला आहे. घरातील माेठ्या मुलाप्रमाणे आपण प्रत्येकासाठी शिक्षण निश्चित केले आहे.
एखाद्याला आजार झाल्यास त्याचा उपचार माेफत व्हावा, अशी सुविधा मी केली आहे. भाजप तुमचे काम व तुमच्या मुलास पराभूत करण्यासाठी २०० खासदार व ७० केंद्रीय मंत्री, इतर राज्यांतील ११ मुख्यमंत्र्यांना प्रचारासाठी उतरवत आहे.
ते आपला अपमान करण्यासाठी येथे आले आहेत. पाणी खराब आहे. शाळांची वाईट स्थिती आहे, असे ते सांगू लागतील. मग काय दिल्ली अशा प्रकारचा अपमान सहन करेल?
जनतेने आता दिल्लीत तुमच्या मतदारसंघात प्रचाराला येणाऱ्या भाजप नेत्यांना हे प्रश्न विचारले पाहिजेत. त्यांना चहा पाजून आपल्या मूळ राज्यात धाडा. दिल्लीकरांना भाषणाची गरज नाही, असे केजरीवाल यांनी सांगितले.