अहमदनगर- नगर तालुका वाळकी येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात बाबुर्डी घुमट येथील साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष व मा सरपंच बलभीम मोरे यांच्या वतीने होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांनाशाळेचे गणवेश वाटप करण्यात आले.
यावेळी प्राचार्य सुभाष बनकर, श्रीराम गोलांडे, भागचंद कोकाटे, सुनील कोठुळे, काकासाहेब देशमुख, अभयकुमार चव्हाण, एकनाथ कासार, अरुण कदम, संतोष भालसिंग आदींसह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बलभीम मोरे म्हणाले की मी या शाळेचा माजी विद्यार्थी असून समाजाचं काही देणं लागत त्या हेतूने होतकरू गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले व माझ्या वतीने या शाळेतील क्रीडा क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे विद्यार्थ्यांना मोफत आहार (डाईट) खर्च देण्यात येणार आहे व हुशार विद्यार्थ्याला शाळेची फी भरायला झेपत नाही त्या विद्यार्थ्यांना माझ्या मार्फत देण्यात येणार आहे असे मोरे म्हणाले