अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- गेल्या दोन दिवसांपासून राहुरीच्या पूर्व भागात थंडीचा कडाका वाढल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. कारण ही थंडी गहू, हरभरा व कांदा पिकास अनुकूल असल्याने पिकांची वाढ होण्यास मदतच होईल.
राहुरीच्या पूर्व भागातील वळण, मानोरी, आरडगाव, पिंपरी, वळण, महाडूक सेंटर, मांजरी आदी गावातील लाभक्षेत्रात शेतकरी बांधवांनी यंदा आपल्या शेतात मोठ्या प्रमाणावर गहू, हरभरा व कांदा या पिकांची लागवड केलेली आहे.
त्याचप्रमाणे यावर्षी समाधानकारक पाऊस झाला असल्याने जमिनीतील पाणी पातळी चांगलीच वाढलेली आहे. त्यामुळे विहीर, बोअरवेल यांना चांगल्या प्रकारे पाणी वाढलेले आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या भागाला वरदान ठरलेले मुळा धरणही पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याने शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड केलेली पहावयास मिळत आहे.
अशा सर्वच पिकांना थंडीची आवश्यकता होती. ती गेल्या दोन दिवसापासून वाढल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com