रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्रात येणार?

Ahmednagarlive24 office
Published:

 

Maharashtra News:फोन टॅपिंग प्रकरणात अडकलेल्या आणि त्यानंतर महाराष्ट्रबाहेर प्रतिनियुक्तीवर गेलेल्या पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी पुन्हा महाराष्ट्रात येण्याच्या तयारीत असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्यासोबत शुक्ला यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर ही चर्चा सुरू झाली आहे. शुक्ला या फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी मानल्या जातात.

त्यांच्याच काळात फोन टॅपिंग प्रकरण घडले होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्या अडचणीत आल्या होत्या. आता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्या पुन्हा महाराष्ट्रात येऊ शकतात, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

या भेटीवर विविध प्रतिक्रियाही उमटल्या आहेत. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सागर बंगल्यावर वॉशिंग मशीनचे काम चालते, असे म्हणत फडणवीस यांना चिमटा काढला आहे.

तर यावर बोलताना कंबोज म्हणाले, की, फडणवीस यांची भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल मी अभिनंदन करण्यासाठी आलो होतो.