Bigg Boss 16 : सध्या बिग बॉस 16 बद्दल जोरदार चर्चा रंगली आहे. हा शो बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) होस्ट करणार आहे.
हा शो होस्ट (Host) करण्यासाठी सलमान खानाने 3 पटीने फी वाढवल्याच्या बातम्या समोर येत आहेत. सलमान ‘KGF 2’ च्या बजेटपेक्षा (KGF 2 Budget) 10 पटीने जास्त पैसे घेणार आहे.

सलमान खानची फी तीन पटीने वाढली
‘बिग बॉस 15’ दरम्यान समोर आलेल्या रिपोर्टमध्ये असा दावा केला जात होता की, सलमान खानने बिग बॉसच्या 15 व्या (Big Boss 15) सीझनसाठी 350 कोटी रुपये फी घेतली आहे.
त्याचवेळी, समोर येत असलेल्या ताज्या वृत्तानुसार, सलमान खानने 16 व्या सीझनसाठी तीन पटीने फी वाढवली आहे. म्हणजेच ‘बिग बॉस 16’साठी अभिनेता सुमारे 1000 कोटी रुपये घेत आहे.
KGF 2 च्या बजेटपेक्षा 10 पट जास्त शुल्क आकारत आहेत
2022 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट KGF: Chapter 2 आहे. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर (Indian box office) सुमारे 1000 कोटी रुपये आणि जगभरातील बॉक्स ऑफिसवर सुमारे 1207 कोटी रुपयांची कमाई केली.
प्रशांत नील (Prashant Neil) दिग्दर्शित हा चित्रपट जवळपास 100 कोटींच्या बजेटमध्ये बनला होता. या अर्थाने, सलमान खान वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या बजेटपेक्षा 10 पट जास्त पैसे घेत आहे.
बिग बॉसचा 16वा सीझन कधी येणार?
नवीन हंगामाचा प्रीमियर ऑक्टोबर 2022 मध्ये अपेक्षित आहे. शोसाठी निर्माते सक्रियपणे स्पर्धकांची निवड करत आहेत. बिग बॉस 16 च्या घोषित उमेदवारांच्या यादीत लॉकअप विजेता मुनव्वर फारुकी, टिकटॉक फेम फैसल शेख, टीव्ही अभिनेत्री शिवीन नारंग आणि विवियन डिसेना यांच्या नावांचा समावेश आहे.
त्याचबरोबर पूनम पांडे, जन्नत जुबेर, कनिका मान, सायशा शिंदे, प्राची देसाई, दीपिका सिंह यांच्या नावाचाही विचार केला जात आहे.