Good news for Govt employees : केंद्रातील एक कोटीहून (one crore ) अधिक कर्मचारी (employees) आणि पेन्शनधारकांसाठी (pensioners) आनंदाची बातमी आहे.
त्यांचा महागाई भत्ता (DA) आणि महागाई मदत (DR) मध्ये वाढ होण्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. केंद्र सरकार (central government) लवकरच आपल्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई वाढवण्याची घोषणा करू शकते.
यावेळी महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. डीए 4 टक्क्यांनी वाढवल्यास ते 34 टक्क्यांवरून 38 टक्क्यांपर्यंत वाढेल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 28 सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची (Central Cabinet) मोठी बैठक होणार आहे.
या बैठकीत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीए आणि डीआरमध्ये वाढीची घोषणा केली जाऊ शकते. नवरात्रीपूर्वी त्याचे पेमेंट सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ऑक्टोबरपासून त्यांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांची थकबाकीही मिळणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जानेवारी आणि जुलैमध्ये वर्षातून दोनदा वाढ केली जाते. आतापर्यंत सरकारने जुलै महिन्याचा डीए वाढवलेला नाही. अशा परिस्थितीत सरकार लवकरच महागाई भत्ता वाढवू शकते. DA मधील अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI) च्या आधारावर DA मधील वाढ निश्चित केली जाते.
यावेळी जून महिन्यात किरकोळ महागाईचा दर 7.01 टक्क्यांवर पोहोचला आहे. 7 व्या वेतन आयोगात किमान मूळ वेतन 18,000 रुपये आणि कॅबिनेट सचिव स्तरावर 56,900 रुपये आहे. 38 टक्क्यांनुसार 18000 रुपयांच्या मूळ पगारावर वार्षिक डीएमध्ये एकूण 6840 रुपयांची वाढ मिळणार आहे.
एकूण डीए दरमहा 720 रुपयांनी वाढेल. 56,900 रुपयांच्या कमाल मूळ वेतनाच्या ब्रॅकेटमध्ये, वार्षिक महागाई भत्त्यात एकूण वाढ 27,312 रुपये असेल. या पगाराच्या ब्रॅकेटमध्ये असलेल्यांना 34 टक्क्यांच्या तुलनेत 2276 रुपये अधिक मिळतील. सरकारच्या महागाई भत्त्यात वाढ केल्याने देशातील 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख निवृत्ती वेतनधारकांना फायदा होईल कारण त्यांच्या पगारात वाढ होणार आहे.
वर्षाच्या सुरुवातीला सरकारने महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवला होता, त्यानंतर महागाई भत्ता 34 टक्क्यांवर गेला होता. आता डीए 4 टक्क्यांनी वाढल्याने महागाई भत्ता 38 टक्के होणार आहे.