जवानाच्या मृत्यूच्या धक्क्याने आजीनेही सोडले प्राण

Published on -

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील राक्षी येथील जवान सचिन रामकिसन साळवे (वय ३३) यांचा आसाममधील गुवाहाटी येथे कर्तव्यावर असताना बुधवारी मृत्यू झाला. याची माहिती गावाकडे कळविण्यात आली.

या धक्क्याने त्यांची आजी (आईची आई) गंगूबाई सुखदेव जगधने (वय ७०) यांचे निधन झाले. आजीवर कालच अंत्यसंस्कार करण्यात आले असून जवान सचिन यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सचिन यांचे बंधू प्रवीण हेही लष्करात आहेत. त्यांनाही या घटनेचा त्रास झाल्याने रुग्णालयात न्यावे लागले. बुधवारी लष्कराकडून गुवाहाटी येथे कार्यरत सचिन यांचा मृत्यू झाल्याची बातमी त्यांच्या कुटुंबियांना कळविण्यात आली.

मृत्यू नेमका कसा झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांचा मृतदेह पुणे मार्गे आज राक्षी येथे आणण्यात येत असून, सकाळी अंत्यसंस्कार होत आहेत. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, पाच वर्षाची मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News