Ahmednagar Flyover : उड्डाणपुलावरील त्या फलकासाठी खासदार विखेंचा फोन, पुढे काय झाले?

Published on -

Ahmednagar Flyover :अहमदनगरच्या उड्डाणपुलावर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रेरणा प्रतिष्ठानतर्फे एक फलक लावला आहे. त्यानुसार उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले आहे.

ही गोष्ट लक्षात आल्यानंतर नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आमदार संग्राम जगताप यांना फोन करून फलक काढून घेण्यास सांगितले. त्यानंतर हा फलक काढण्यात आला आहे.

यासंबंधी विखे पाटील म्हणाले, ‘या उड्डाणपुलाला अद्याप कोणतेही नाव देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना म्हणून हा फलक लावला असेल तर तो काढून घेण्यासंबंधी आपण आमदार जगताप यांच्याशी बोललो आहे.

आम्ही दोघांनी या पुलाच्या बाबतीत कोणतेही राजकारण करायचे नाही, यावर कोणतेही राजकीय फलक लावायचे नाहीत, असे ठरविले आहे. या पुलाच्या खांबांवर सचित्र शिवसृष्टी साकारण्यात येत आहे.

त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे केवल नाव देण्यापेक्षाही त्यांना जास्त सन्मान देण्यात येत आहे,’ असेही विखे पाटील म्हणाले

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe