‘त्या’फोटोमुळे सुजय विखे नेटीझन्सकडून ट्रोल…व्हायरल फोटोमुळे सुजय विखेंविरोधात नाराजी !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर : जिल्हा परिषद सदस्य व राहूरी तालुक्यातील राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शिवाजी गाडे पाटील यांचे मंगळवार दि.२ रोजी पहाटे दुःखद निधन झाले.

निधनानंतर त्यांचे पार्थिव देह अंतिमदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्या दु:खद प्रसंगी डॉ.विखे पार्थिव देहाच्या अंतिमदर्शन घेण्यासाठी पोहचले.

अंतिम दर्शन घेतांना विखे यांनी हार अर्पण करतांना काढलेला फोटो सर्वत्र व्हायरलं झाला आहे.

श्रद्धांजली देतांना फोटोला हार घालत पोज देतात त्याच प्रकारे “ते” फुलांच्या हाराला हात लावून उभे रहात फोटो काढला.

त्यांचा “तो” फोटो सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यांच्या या कृतीची सोशल मीडियावर खिल्ली उडवली आहे. अनेकांनी तिखट शब्दात प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

पहा निवडक प्रतिक्रिया –

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment