Ahmednagar News : रात्रीच्या वेळी अंधारात चोर – पोलिसांचा सिनेस्टाईल २५ किमीचा थरार …!

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : पोलिसांनी फ्रिजचे दुकान फोडून दोन डि फ्रिज चोरून नेणाऱ्या चोरट्यांचा सुमारे २५ किलोमिटर सिनेस्टाईल पाठलाग करून एका आरोपीला जेरबंद केले. तर इतर दोघेजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.

ही घटना नगर मनमाड रस्त्यावरील राहुरी परिसरात घडली. राहुरी शहर हद्दीत नगर- मनमाड राज्य महामार्गावर खंडोबा मंदिराशेजारी शितल नावाचे फ्रिजचे दुकान आहे.

काल पहाटे अडिच वाजेच्या सुमारास तीन चोरट्यांनी या दुकानचे शटर उचकटून दुकानातील सात ते आठ डि फ्रिज दुकानच्या बाहेर काढून बोलेरो पिकअप गाडीत भरत होते.

दरम्यान ६५ हजार रूपये किंमतीचे दोन फ्रिज त्यांनी गाडीत भरले होते. परंतु त्याच दरम्यान पोलिस पथक गस्त घालत होते. पोलिसांच्यागाडीला पाहून ते गाडी घेऊन पळून जाऊ लागले.

पोलिस पथकाने त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग सुरू केला. अंधारात जिवाची पर्वा न करता सुमारे २५ किलो मिटर म्हणजे चक्क सोनईपर्यंत हा पाठलाग सुरू होता.

त्या दरम्यान सोनई येथे चोरांची गाडी पलटी झाली. अन् पोलिस पथकाने ताबडतोब झडप घालत एका चोराला ताब्यात घेतले. मात्र दोघेजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe