Ahmednagar Crime : एखादी घटना घडल्यानंतर आपण नेहमी एक वाक्य उच्चारतो ते म्हणजे शेवटी त्याच्या नशीबातच ते होते. मात्र याचा काल प्र त्यय आलाच…तो असा पती पत्नी आपल्या दुचाकीवरून नगरला निघाले मात्र रस्त्यातच त्यांची दुचाकी पंक्चर झाली.
त्यामुळे त्यांना एका तरूणाने लिप्ट दिली. मात्र भरधाव वेगातील आयशर टेम्पोने या दुचाकीला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत या दाम्पत्याचा मृत्यू झाला तर तो तरूण जखमी झाला.
ही घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली. संभाजी मानसिंग मोहिते आणि प्रियांका संभाजी मोहिते असे मृत दाम्पत्याची नावे आहेत. तर सोमनाथ पानसरे हा जखमी झाला.
या बाबत सविस्तर माहिती अशी, दौंड येथील मोहिते दाम्पत्य (एम.एच १५ पी.क्यू. ७९७८) या दुचाकीवरून दौंडकडून अहमदनगरकडे येत होते. मात्र त्यांची गाडी पंक्चर झाल्याने ते रस्त्याने पायी जात होते.
यावेळी सोमनाथ पानसरे हा तरुण आपल्या मित्रासोबत जात होता. मदत करण्याच्या हेतूने त्याने या दाम्पत्याला आपल्या गाडीवर घेऊन त्यांची पंक्चर गाडी मित्राला पाठीमागून घेऊन येण्यास सांगितले.
काही अंतर पुढे जाताच पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या आयशर कंपनीच्या (एम.एच १६ सी.ए ०३४४) या टेम्पोने जोराची धडक दिल्याने
दुचाकीवरील संभाजी मोहिते आणि त्यांची पत्नी प्रियांका मोहिते हे दोघेजण रस्त्यावरपडल्याने गंभीर जखमी होऊन संभाजी मोहिते यांचा जागीच मृत्यू झाला तर प्रियांका मोहिते यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सोमनाथ पानसरे हा तरुण बाजूला पडल्याने किरकोळ जखमी झाला.