Ahmednagar News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने अहमदनगर जिल्हाप्रमुख म्हणून नगरसेवक अनिल शिंदे यांची नियुक्ती जाहीर केली आहे.
स्वत: मुख्यमंत्री शिंदे यांनी ही नियुक्ती जाहीर केली. शिंदे यांनी सर्वांत प्रथम मुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी अनेकांचा प्रवेश घडवून आणला.

त्याची पावती त्यांना मिळाल्याचे मानले जाते. अनिल शिंदे यांनी सोमवारी रात्री पारनेर तालुक्यातील शिवसेना तालुका प्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश घडवून आणला.
तालुका प्रमुख विकास उर्फ बंडू रोहकले, पाडळीचे सरपंच हरीश दावभट, भाळवणीचे सरपंच बबन चेमटे, विकास सोसायटीचे चेअरमन ठकसेन रोहोकले, चेअरमन बाबासाहेब रोहकले, शाखाप्रमुख अक्षय रोहकले यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी नगरचे जिल्हाप्रमुख म्हणून अनिल शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. सध्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे (दक्षिण) व रावसाहेब खेवरे (उत्तर) दोघेही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहेत. आता शिंदे यांची शिंदे गटाकडून नियुक्ती झाली आहे.