Nokia 6310 : मागील काही वर्षांपूर्वी एचएमडी ग्लोबलने (HMD Global) नोकियाला (Nokia) परवाना दिलेला होता. तेव्हापासून, नोकिया ही कंपनी सतत नवीन फीचर फोन लाँच (Nokia Feature phone launch) करत आहे.
नोकियाने काही दिवसांपूर्वी नोकिया 6310 लाँच (Nokia 6310 launch) केला होता. सध्या हा फीचर फोन नो कॉस्ट ईएमआयवर (No Cost EMI) खरेदी करू शकता.

नोकिया 6310 फोन 165 रुपयांना विकत घ्या
जर आपण Nokia 6310 कीपॅड फोनबद्दल बोललो तर, हा हँडसेट ई-कॉमर्स साइट Amazon India वर No Cost EMI वर (Amazon) खरेदी करण्याचा पर्याय दिला जात आहे, शिवाय Amazon Pay वरून एक्सचेंज डिस्काउंट (Amazon Pay Exchange Discount) दिले जात आहे.
त्याच वेळी, जर तुम्ही अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्डने फोन विकत घेतला, तर 12 महिन्यांच्या ईएमआयवर दरमहा फक्त 165 रुपये द्यावे लागतील.
मात्र, यामध्ये ग्राहकांकडून वर्षभरासाठी 518 रुपये व्याज आकारले जाणार आहे. त्यानुसार ग्राहकांना 3917 रुपये मोजावे लागणार आहेत. याशिवाय कंपनी फोनवर एक वर्षाची रिप्लेसमेंट गॅरंटी देत आहे.
नोकिया 6310 चे स्पेसिफिकेशन
वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर Nokia 6310 मध्ये 2.8-इंचाचा डिस्प्ले आहे. फोनमध्ये UNISOC 6531F प्रोसेसर, 8MB रॅम आणि 16MB इनबिल्ट स्टोरेज आहे. याशिवाय फोन सीरीज 30+ (S30+) ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे.
त्याच वेळी, Nokia 6310 मध्ये 0.3 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आहे जो LED फ्लॅशसह येतो. फोनमध्ये मायक्रोएसडी कार्ड स्लॉट उपलब्ध आहे आणि वापरकर्ते 32 जीबी पर्यंत स्टोरेज वाढवू शकतात. हँडसेटमध्ये ब्लूटूथ 5.0, वाय-फाय, ड्युअल-सिम सपोर्ट आणि एफएम रेडिओसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये 1150mAh क्षमतेची बॅटरी आहे, जी 2001 च्या मॉडेलपेक्षा थोडी मोठी आहे. पण नोकियाचा दावा आहे की यामुळे 7 तासांपेक्षा जास्त टॉकटाइम आणि 35 दिवसांपर्यंत स्टँडबाय टाइम मिळेल.
फोनमधून बॅटरी काढता येते. फोनसह बॉक्समध्ये चार्जर आणि मायक्रो-यूएसबी केबल उपलब्ध आहेत. नोकिया 6310 चार रंग पर्यायांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो – काळा, निळा, हिरवा आणि पिवळा. Amazon India आणि कंपनीच्या साईट व्यतिरिक्त, फोनची विक्री ऑफलाइन स्टोअर्सवर होत आहे.
| |||
16 एमबी रॅम | |||
डिसप्ले | |||
2.8 इंच (7.11 सेमी) | |||
143 ppi, TFT | |||
कॅमेरा | |||
0.3 MP प्राथमिक कॅमेरा | |||
एलईडी फ्लॅश | |||
बॅटरी | |||
1150 mAh | |||
मायक्रो-यूएसबी पोर्ट |