आपल्याला कितीही पाऊस आवडत असला तरी पावसाळ्यात त्वचेशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करता येत नाही.
डोक्याला खाज येण्यापासून ते तेलकट त्वचेपर्यंत अनेक समस्यांना या ऋतूत सामोरे जावे लागू शकते.जर तुम्ही अशाच त्वचेच्या समस्यांनी त्रस्त असाल, तर या टिप्सचा (skincare tips)अवलंब करून तुम्ही पावसाळ्यात तुमची त्वचा तजेलदार बनवू शकता.
सनस्क्रीनचा वापर करा (Use Sunscreen)
पावसाळ्यात तुमची त्वचा निरोगी ठेवायची असेल, तसंच चमकदार ठेवायची असेल, तर सनस्क्रीन वापरा.सनस्क्रीन हानिकारक UV किरणांमुळे (harmful UV rays) त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करते आणि वृद्धत्वविरोधी उपाय म्हणून देखील कार्य करते.कमीतकमी 30+ SPF संरक्षणासह सनस्क्रीन वापरायला हाव.
मॉइश्चरायझर वापरणे आवश्यक आहे
पावसाळ्यात ओलाव्यामुळे घाम जास्त येतो, त्यामुळे अनेकजण मॉइश्चरायझरचा वापर कमी करतात.पण, मॉइश्चरायझर्सचा वापर कमी केल्याने त्वचेचे निर्जलीकरण होते. म्हणून, तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेण्याच्या दिनचर्येत मॉइश्चरायझरला महत्त्वाचे स्थान द्यावे.पावसाळ्यात त्वचेवर जेल आधारित मॉइश्चरायझर (gel based moisturiser)वापरणे चांगले आहे कारण ते हलके राहण्याबरोबरच त्वचा हायड्रेट करण्यास मदत करते.
एक्सफोलिएशन (exfoliation)आणि हायड्रेटिंग मास्क(hydrating mask)आवश्यक आहे
मॉइश्चरायझिंगसह वेळोवेळी त्वचेला एक्सफोलिएट करणे महत्वाचे आहे कारण ते कोरडी त्वचा आणि मृत त्वचेच्या पेशींपासून मुक्त होण्यास मदत करते.तुम्ही घरगुती स्क्रबने एक्सफोलिएशन करा किंवा बाजारातून सौम्य स्क्रब क्रीम मिळवा, पण तुम्हाला हे काम हलक्या हातांनी करावे लागेल.याशिवाय आठवड्यातून दोनदा हायड्रेटिंग मास्क वापरण्याची खात्री करा.
चेहरा जास्त धुवू नका
साधारणपणे असे दिसून येते की पावसाळ्यात लोक तेलकट प्रभाव दूर करण्यासाठी वारंवार चेहरा धुतात, परंतु तुम्ही तसे करू नये.खरं तर, यामुळे, तेलकट त्वचेची नैसर्गिक चमक संपते आणि चेहरा अधिक तेल तयार करू लागतो, परिणामी त्वचा खूप चिकट दिसू लागते.दिवसातून दोन ते तीन वेळा सौम्य फेसवॉश आणि थंड पाण्याने चेहरा धुतल्यास चांगले होईल.