EPFO : नोकरदार कर्मचाऱ्यांच्या (Employees) पगारातून काही भाग EPFO मार्फत PF आणि पेन्शन स्कीममध्ये (EPS) जमा केला जातो. त्यामुळे कर्मचाऱ्यासह त्याच्या कुटुंबियांचं भविष्य सुरक्षित (Safe future) होते.
आता EPFO च्या EPS95 या योजनेद्वारे (EPS95 scheme) कर्मचाऱ्याच्या कुटुंबियाला पेन्शन (EPS95 Pension) मिळणार आहे. जाणून घेऊया या योजनेबद्दल.
काय आहे EPS95 योजना
जर पीएफ खातेधारकाचा (PF account holder) अपघाती मृत्यू (Accidental death) झाला, तर अशा परिस्थितीत त्याची पत्नी किंवा पती आणि मुलांनाही ईपीएफओकडून पेन्शनचा लाभ दिला जातो.
या पेन्शन सुविधेचा लाभ केवळ EPFO च्या EPS95 योजनेद्वारे दिला जातो. EPFO ने नुकत्याच केलेल्या ट्विटद्वारे या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या फायद्यांबाबतही माहिती दिली आहे.
किती मिळते पेन्शन
EPFO ने आपल्या ट्विटमध्ये सांगितले आहे की, पेन्शनची रक्कम विधवा पेन्शनच्या 75 टक्के असेल. तसेच प्रत्येक दोन अनाथ बालकांना एकाच वेळी या पेन्शनचा लाभ दिला जाणार आहे. 750 रुपये दरमहा पेन्शन म्हणून दिले जातील.
अनाथ मुलांना वयाच्या 25 वर्षापर्यंत हे पेन्शन दिले जाईल. जर मूल किंवा पत्नी कोणत्याही अपंगत्वाने ग्रस्त असेल तर आयुष्यभर पेन्शन दिली जाईल.
ही कागदपत्रे जमा करावी लागतात
पेन्शनचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला EPFO कडे काही कागदपत्रे देखील सादर करावी लागतील. यामध्ये निवृत्तीवेतनधारकाचे मृत्यू प्रमाणपत्र, लाभार्थ्यांच्या आधार कार्डची प्रत, रद्द केलेल्या चेकसह बँक खात्याचे तपशील किंवा पासबुकची प्रत आणि मुलांच्या बाबतीत वयाचा पुरावा यांचा समावेश आहे.