Asia Cup Team India : आशिया चषकात (Asia Cup) पाकिस्तानला (Pakistan) हरवून भारताने (Team India) शानदार सुरुवात केली.
भारताने हा सामना पाच विकेटने जिंकला. टीम इंडियाने 10 महिन्यांपूर्वी झालेल्या पराभवाचा बदला घेतला. गतवर्षी दुबईतच झालेल्या T20 विश्वचषकात (T20 World Cup) पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता.

या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघाने जोरदार तयारी केली होती. 22 ऑगस्टलाच टीम दुबईला (Dubai) पोहोचली होती. बीसीसीआयने (BCCI) खेळाडूंच्या राहण्याची उत्तम व्यवस्था केली.
बीसीसीआयने दुबईतील एका महागड्या हॉटेलमध्ये संघाची राहण्याची सोय केली आहे. टीम इंडियाने प्रसिद्ध ‘पाम जुमेराह’ (Palm Jumeirah) हॉटेलमध्ये मुक्काम केला आहे. आयपीएल (IPL) दरम्यान चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) संघही या हॉटेलमध्ये थांबला होता. हे हॉटेल जगातील सर्वोत्तम आणि आलिशान हॉटेल्सपैकी एक आहे.
एका दिवसाची किंमत जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल
‘पाम जुमेराह’ हॉटेलच्या एका मजल्यावर टीम इंडियाच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. या हॉटेलमधून दुबईचे विहंगम दृश्य पाहता येते. हॉटेलमध्ये शॉपिंग सेंटर, मोठा स्विमिंग पूल, 3D आणि 4D थिएटर्स देखील आहेत.
येथे राहण्यासाठी एका दिवसाचे भाडे सुमारे 30 ते 40 हजार आहे. हे फक्त एका माणसाचे भाडे आहे. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ जोडून जवळपास 30 लोक इथे राहत आहेत.
अशा प्रकारे बीसीसीआयला एका दिवसासाठी 9 ते 10 लाख रुपये खर्च करावे लागतात. येथे सेवा आणि जेवणाचा खर्च स्वतंत्रपणे भरावा लागतो.
भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल बोलायचे झाले तर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 19.5 षटकात 147 धावा केल्या. मोहम्मद रिझवानने 43 धावा केल्या.
भुवनेश्वर कुमारने चार आणि हार्दिक पंड्याने तीन बळी घेतले. प्रत्युत्तरात भारताने हा खडतर सामना 19.4 षटकांत पाच विकेट्स राखून जिंकला.