पदवीचा उपयोग समाज उभारणीसाठी करा : आमदार आशुतोष काळे

Ahmednagarlive24
Published:

कोपरगाव :- पदवीचा उपयोग स्वत:बरोबरच समाज उभारणीसाठी करा, असा सल्ला आमदार आशुतोष काळे यांनी स्नातकांना दिला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पाचवा पदवीग्रहण समारंभ काळे महाविद्यालयात झाला.

या वेळी आमदार काळे म्हणाले, जगाच्या पाठीवर एकूण लोकसंख्येच्या ४० ते ४५ टक्के युवा वर्ग आजमितीला कोणत्याही देशाकडे नाही. २०२० पर्यंत आपण देशाच्या प्रगतीचे स्वप्न पहात होतो.

मात्र, हे स्वप्न सत्यात उतरताना दिसत नाही.त्यासाठी मिळालेल्या पदवीच्या साहाय्याने ज्या क्षेत्रात जाणार आहात त्या क्षेत्रात अत्युच्च कामगिरी करून देशाच्या प्रगतीला हातभार लावा.

प्रमुख अतिथी एसएसजीएम कॉलेजचे प्राचार्य डॉ. शंकरराव थोपटे बीज भाषणात म्हणाले, शिक्षणातून समाज घडत असतो. शिक्षण महर्षी शंकरराव काळे यांच्या दूरदृष्टीतून ग्रामीण भागातील मुला-मुलींना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या. उच्च शिक्षण पूर्ण करून समाजात स्वत:ची ओळख निर्माण करा.

शिक्षणाने समाज सुशिक्षित होत असताना आज ज्या काही घटना घडत आहेत, त्यासाठी खरेच शिक्षण कारणीभूत आहे का? यावर चिंतन केले गेले पाहिजे. आपण ज्या विषयात शिक्षण घेतो, त्याचा सखोल अभ्यास करा. समाज व देशाची गरज ओळखून संशोधन करा.

आपले विचार दुसऱ्याला पटवून देण्याची कला अवगत असणे आवश्यक आहे. छबुराव आव्हाड, विश्वस्त कारभारी आगवण, भास्करराव आवारे, दिलीप चांदगुडे आदी या वेळी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment