Ahmednagar News : अवैध दारुविक्री करणाऱ्यास याबाबत जाब विचारणाऱ्या महीलांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार झाला. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयालाच कुलुप लावले.
त्यानंतर पोलिस ठाण्यात संबधित दारु विक्रेते व त्या महिलेविरुदध कारवाई करण्याची मागणी केली. हा प्रकार पाथर्डी तालुक्यात घडला आहे.
याबाबत सविस्तर असे, पाथर्डी तालुक्यातील साकेगावात होत असलेल्या अवैध दारु विक्रीवरून गावातील महिलांनी आक्रमक पवित्रा घेत पंधरा दिवासापुर्वी ग्रामसभा घेवुन दारु विक्री बंद करण्याची मगाणी केली होती.
याबाबत उत्पादनशुल्क विभागाच्या अहमदनगर येथील अधिकाऱ्यांसह पोलिसांना याबाबत कारवाईची मागणी केली होती. परंतु अवैध दारूविक्रीवर कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्याने
एका विद्यालयाच्या परिसरात असलेल्या ठिकाणी गावातील लोक दारु पिऊन विद्यार्थ्यींनी व महिलांना त्रास देतात. यामुळे अनेकांची कुटुंब उध्वस्त झाले आहेत.
याप्रकरणी काल महिलांनी प्रथम ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना दारु विक्री का बंद होत नाही. तुम्ही दारु बंद करणार नसाल तर आम्ही पुढे होतो, असे म्हणुन ग्रामपंचायत कार्य़ालयाला टाळे ठोकले.
त्यानंतरया महिला दारु विक्री करणाऱ्या टपरीकडे गेल्या तेथे दारु विक्रेत्याला जाब विचारला असता दारु विक्रेत्याच्या पत्नीने एका महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली.
त्यानंतर उपस्थित सर्व महिला आक्रमक पवित्रा घेतल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. परंतु ग्रामस्थ व पोलिसांनी मध्यस्ती करुन हा वाद मिटविला. त्यानंतर संबंधीत महिला व दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.