Ahmednagar News : एक सराईत गुन्हेगार वेषांतर करून पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र पोलिसांनी विशेष ऑपरेशन राबवून या गुन्हेगारास जेरबंद केले आहे. त्याच्याकडून एकूण २ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
दिपक सुरेश गायकवाड (रा.भिंगान) असे या आरोपीचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, श्रीगोंदा पोलिसांकडून विविध गुन्हेगारांचा शोध घेण्याची विशेष मोहीम सुरू आहे.
पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना भिंगान खालसा येथील दिपक गायकवाड हा त्याच्या साथीदारांच्या मदतीने विविध गुन्हे करत असून, त्याच्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
मात्र तो सुमारे तीन वर्षांपासून वेषांतर करून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. दरम्यान तालुक्याती शेडगाव परिसरात गायकवाड हा संशयितरित्या फिरत असल्याचे पोलिसांना समजले त्यानुसार या ठिकाणी कारवाई करत त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता.
त्याने आतापर्यंत बनावट नंबर टाकून ८ दुचाक्या विकल्याची पोलिसांना कबुली दिली. त्या ताब्यात घेत त्याच्या जवळील रोख रक्कम असा सुमारे २ लाख ६९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.