बहुप्रतीक्षित केजीएफ 2 मध्ये रवीना टंडन

Published on -

अभिनेते यश यांचा बहुचर्चीत आणि बहुप्रतीक्षित केजीएफ 2 म्हणजेच कोलार गोल्ड फिल्डस् या चित्रपटाबाबत महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. केजीएफ 2 चित्रपटात अभिनेत्री रवीना टंडन महत्वाची भूमिका बजावणार आहे. अखेर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर याबाबत चित्रपटाच्या निर्मिती चमूने ट्विटर द्वारे माहिती दिली. रवीना टंडन यांनी केजीएफ 2 च्या चित्रीकरणासाठी सुरवात केलेली आहे. 

अभिनेते संजय दत्त यांच्यानंतर रवीना टंडन यांच्या आगमनामुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. विषेश म्हणजे अभिनेत्री रवीना टंडन यांचे पती आणि एए फिल्मस् या चित्रपट वितरण संस्थेचे प्रमुख अनिल थडानी केजीएफ चित्रपटाशी पूर्वीपासून जोडलेले आहे. हिंदी भागाच्या वितरणाची जबाबदारी अनिल थडानी यांच्यावर आहे. यापूवी बाहुबली आणि साहो चित्रपटातही अनिल थडानी यांनी महत्वाची भूमिका बजाविली होती. 

मागिल वर्षी डिसेंबर महिन्यात केजीएफ 2 चे फर्स्ट लुक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. केजीएफच्या निर्मिती चमू होम्बाले फिल्म्स यांनी ट्विटर द्वारे याबाबत घोषणा केली. फर्स्ट लुक पोस्टर मध्ये अभिनेते यश यांच्या ‘रॉकी भाई’ चे नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. या नवीन पोस्टरला सामाजिक माध्यमांवर चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पोस्टरला ‘ रिबिल्डींग दि एम्पायर ‘ असे वाक्य देण्यात आले आहे. केजीएफ मध्ये यश शिवाय जेष्ठ अभिनेते संजय दत्त, श्रीनिधी शेट्टी, अभिनेत्रे अनंत नाग, मालविका अविनाश महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

प्रशांत नील दिग्दर्शित केजीएफ चित्रपट डिसेंबर 2018 साली कन्नड, तामिळ, तेलगू , मल्याळम आणि हिंदी भाषेत प्रदर्शित झाला. मूळ कन्नड भाषेत असलेल्या या चित्रपटास प्रेक्षक तसेच समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. केजीएफची निर्मिती होम्बाले फिल्म्स अंतर्गत करण्यात आली असून 2020 साली केजीएफचा दुसरा भाग कन्नड, तामिळ, तेलगू , मल्याळम , हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. हिंदी प्रदर्शनाची जबाबदारी फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेन्मेंट आणि अनिल थडानी यांच्या ए. ए फिल्मस् घेतली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News